Pune : दुर्बल घटकांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसचा स्तुत्य उपक्रम – अभय छाजेड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना Corona महामारीमध्ये समाजातील दुर्बल घटकांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकून मदतीचे काम सुरू केले आहे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. कठीण प्रसंगामध्ये निस्वार्थी भावनेने शोषित घटकांसाठी युवकांचा स्तुत्य उपक्रम आहे. निस्वार्थी भावनेने वेश्या वस्तीतील महिलांना दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यांची समस्या ओळखून अक्षय जैन व त्यांच्या सहकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी व जबाबदारी ओळखून सुरू केलेला उपक्रम युवकांना प्रेरणा देणारा ठरत आहे, असे स्पष्ट मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड Abhay Chhajed यांनी व्यक्त केले.

युवक काँग्रेसच्या वतीने शुक्रवार पेठ पोलीस चौकी येथे स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसच्या वतीने बुधवार पेठेतील महिलांना दररोज रात्रीचं जेवण, आणि 300 घरामध्ये वाफ घेण्याची मशीन आणि काढा वाटप करण्यात आले. याप्रसंगी फरासखाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र लांडगे, प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अक्षय जैन, शुक्रवार पेठ पोलिस चौकीच्या पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील, युवराज शहा उपस्थित होते.

महावीर जैन विद्यालयाचे युवराज शहा म्हणाले, की, युवक काँग्रेसच्या वतीने आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रणेते स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीचे निमित्त साधून सध्याच्या कोरोना Corona महामारीमूळे निर्माण झालेल्या आपत्तीजनक परिस्थितीत गरीब गरजूंना दररोज रात्रीचे जेवण देण्याची मोहीम हाती घेतली आहे. कोरोना Corona महामारीची भीती असूनही युवक या मोहीमेत मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत, या उपक्रमासाठी अक्षय जैन यांचे कार्य मोलाचे आहे. भारतात केवळ राजीवजींच्या दूरदर्शीपणामुळे येथील युवक जगाच्या संगणक नकाशावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकला, ही बाब नाकारता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

भूषण भंडारी, ऋत्विक शिनकर, समर्जीत सोनवणे, शिवेंद्र चव्हाण, ईशा ओसवाल, गीताली जैन, पार्थ देशमुख, आयुष जैन गरजूंपर्यंत जेवण पोहोचविण्यात मोलाची कामगिरी करीत आहेत.

Also Read This : 

Pune : पुण्यात रुग्णवाहिकांसाठीचे नवे दर निश्चित

 

तोंड आल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय ; जाणून घ्या

 

भाजपच्या महिला खासदारावर हल्ला; जिल्हाधिकाऱ्यांनीही उचलला नाही फोन Video

 

अशक्तपणा दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय