Pune Gram Panchayat recruitment scam | पुणे मनपामध्ये समाविष्ट झालेल्या समाविष्ट 23 गावांतील ग्रामपंचायत नोकर भरती ‘महा’ घोटाळा! 14 ग्रामसेवक, 3 कृषी विस्तार अधिकारी निलंबित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Gram Panchayat recruitment scam | पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावातील ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आलेल्या नियमबाह्य नोकरी प्रकरणात (Pune Gram Panchayat recruitment scam) 14 ग्रामसेवक आणि 3 कृषी विस्तार अधिकाऱ्यांना आज (सोमवार) निलंबित (Suspend) करण्यात आले आहे. तसेच आणखी 6 ग्रामसेवकांना दोषारोपपत्र (Charge sheet) दाखल करण्यासाठी नोटीस (notice) बजावण्यात आली आहे.

 

निलंबित करण्यात आलेल्या 14 ग्रामसेवक, 3 कृषी विस्तार अधिकारी आणि नोटीस बजावण्यात आलेल्या 5 अशा एकूण 22 अधिकारी, कर्मचाऱ्यांवर खातेनिहाय चौकशीची (inquiry) शिफारस शासनाकडे करण्यात आली आहे. या प्रकरणी 22 ग्रामपंचायतीमधील तत्कालीन सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य अशा एकूण 212 जणांना जिल्हा परिषदेकडून (Zilla Parishad) नोटीस बजावण्यात आली होती.

 

1114 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांपैकी 658 जणांची नियमबाह्य नेमणूक (Pune Gram Panchayat recruitment scam) करण्यात आली. याची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची (Inquiry Committee) स्थापना करण्यात आली होती. चौकशीत 658 जणांची नियमबाह्य नेमणूक केल्याचे समोर आले. नियमबाह्य नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांसंदर्भात आता महापालिका त्यांच्या अधिकारात निर्णय घेणार आहे.

चौकशी समितीचा संक्षिप्त अहवाल
समाविष्ट गावामधील 22 अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आणि या गावातील 212 पंचायतराज माजी सदस्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. याशिवाय 16 अधिकाऱ्यांना तातडीने सेवेतून निलंबित केले आहे. 20 ग्रामपंचायतीतील 69 कर्मचारी यांच्या मंजूर आकृतीबंधावर होते, यापूर्वी 247 जणांची भरती केली होती आणि ते अनेक दिवस काम करत होते. मात्र, या ग्रामपंचायती पुणे महापालिकेत जाण्याआधी 658 जणांची भरती केली. हवेलीच्या (Haveli) गटविकास अधिकाऱ्यांनी याआधी केलेल्या चौकशीत मांजरी ग्रामपंचायतमध्ये 44 जणांची भरती करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते.

 

निलंबित करण्यात आलेल्या ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात सध्याचे कार्यरत ठिकाण

1. न्यु. कोपरे ग्रामपंचायत (New. Kopare Gram Panchayat)
– सयाजी शहाजी क्षीरसागर (हवेली)
– सतिश मल्हारी गुंडले (भोर)

 

2. होळकरवाडी ग्रामपंचायत (Holkarwadi Gram Panchayat)
– विराज पवार (मावळ)

 

3. भिलारेवाडी ग्रामपंचायत (Bhilarewadi Gram Panchayat)
– विशाल निकम (मुळशी)

 

4. नांदेड ग्रामपंचायत (Nanded Gram Panchayat)
– एन.व्ही मिसाळ (हवेली)
– एन.जे. झोळ (मुळशी

5. औताडे हांडेवाडी ग्रामपंचायत (Autade Handewadi Gram Panchayat)
– पी.यु. कोरडे (खेड)
– ए.डी घोगरे, प्रशासक (कृषी विस्तार अधिकारी) – (पंचायत समिती मुळशी)

 

6. नऱ्हे ग्रामपंचायत (Narhe Gram Panchayat)
– बी.आर गावडे (मावळ)

 

7. सुस ग्रामपंचायत (Sus Gram Panchayat)
– निकेतन धापटे, प्रशासक (कृषी विस्तार अधिकारी) – (पंचायत समिती हवेली)

 

8. वडाचीवाडी ग्रामपंचायत (Vadachiwadi Gram Panchayat)
– माधवी दिपक हरपाळे (पुरंदर)

 

9. बावधन ग्रामपंचायत (Bawadhan Gram Panchayat)
– संजय शंकर गव्हाणे (इंदापूर)

 

10. मांगडेवाडी ग्रामपंचायत (Mangdewadi Gram Panchayat)
– विवेक सर्जेराव (दौंड)

 

11. गुजर निंबाळकरवाडी ग्रामपंचायत (Gujar Nimbalkarwadi Gram Panchayat)
– विशाल निकम (मुळशी)

 

12. नांदोशी ग्रामपंचायत (Nandoshi Gram Panchayat)
– ज्ञानेश्वर गौतम वाघमारे (जुन्नर)

 

13. मांजरी बु. ग्रामपंचायत (Manjri Gram Panchayat)
– मधुकर बाबूराव दाते (जुन्नर)

 

14. जांभुळवाडी/कोळवाडी ग्रामपंचायत (Jambhulwadi / Kolwadi Gram Panchayat)
-संतोष राम कांबळे (मुळशी)

 

Web Title :- Pune Gram Panchayat recruitment scam | Big scam of recruitment of Gram Panchayat servants in 23 villages included in Pune Municipal Corporation! 14 Gramsevaks, 3 Agriculture Extension Officers suspended

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PO Monthly Income Scheme | दर महिना 2500 रुपये मिळवण्यासाठी एक रक्कमी किती जमा करावे लागतील; जाणून घ्या सविस्तर

 

Nora Fatehi Bold Photo | नोरा फतेहीच्या ‘या’ बोल्ड फोटोनं सोशल मीडियाचा वाढला पारा, पाहा व्हायरल फोटो

 

Nawab Malik | नवाब मलिकांचा देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा एकदा गंभीर आरोप; म्हणाले…