Pune : आजोबांनी आपआपसात वाद घालणार्‍यांना समजावलं, तरूणानं चक्क पिस्तुलानं धमकावलं; मार्केटयार्ड परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आपआपसात वाद सुरू असताना जेष्ठ नागरिकांने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतर एकाने थेट पिस्तुल दाखवत धमकवल्याचा प्रकार मार्केटयार्ड येथे घडला आहे. तर परिसरातील नागरिकांचे पाण्याचे ड्रम ओतून देत पत्र्यांच्या घरावर मारून गोंधळ घातला आहे.

याप्रकरणी अजय गायकवाड (वय 25, रा. मार्केटयार्ड) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील दोन आरोपी यांच्यात आपआपसात भांडण सुरू होते.यामुळे फिर्यादी यांच्या आजोबांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींना याचा राग आला. त्याने फिर्यादी यांना लथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी त्यांचे आजोबामध्ये भांडण सोडवण्यास मध्ये आले तर त्यांनाही मारहाण करत एकाने थेट चांदीच्या कलरचे पिस्तुल दाखवत जास्त बोलू नका नाहीतर संपूर्ण घर दार संपवून टाकेन अशी धमकी दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी फिर्यादी हे घरी जात असताना त्यांना अडवून काल तुला फक्त पिस्तुल दाखवली असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्या शेजारी असलेला पाण्याचा ड्रम फेकून देत इतरही ड्रम खाली पडून घरांवर लाथा मारून गोंधळ घातला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.