खळबळजनक ! आजी-आजोबांनी केला ‘बिनधास्त’ सेक्स अन् नातीला जबरदस्तीनं पहायला लावलं, मावशीच्या नवर्‍यानं केला बलात्कार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  नातीला आजी आणि आजोबांनी शारिरीक संबंध प्रस्थापित करुन जबरस्तीने बघायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच या अल्पवयीन मुलीवर तिच्या मावशीच्या पतीने बलात्कार केल्याच सुद्धा समोर आलं असून, याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सख्ख्या आजी आजोबांनी पीडितेसमोरच शारिरीक संबंध प्रस्थापित करुन पाहण्याची जबरदस्ती केली. या प्रकाराला पीडितेने नकार दिल्यानंतर तिला मारहाण व शिवीगाळ करण्यात आली. तसेच पीडित मुलीचे आजोबा यांनी मुलीवर शारिरीक अत्याचार सुद्धा केले आहे. फिर्यादीने याबाबत आजीला सांगतिले असता, तिने याकडे दुर्लक्ष केले. २०१४ पासून २०२० पर्यंत वेळापूर, पंचशील नगर व म्हसवड येथे ही घटना घडली.

दरम्यान, पीडितेच्या मावशीच्या नवऱ्याने देखील तिला गावाला नेऊन तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी पीडित मुलीने पुण्यातील एका सामाजिक संस्थेच्या मार्फत पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. चिंचवड पोलिसांनी आजी, आजोबा आणि मावशीच्या पतीवर गुन्हा दाखल करुन तो माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे वर्ग केला.

कुऱ्हाडीचा धाक दाखवत पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

आळंदी परिसरात ३१ जुलै च्या रात्री पत्नी आणि मुलाला कुऱ्हाडीचा धाक दाखवून पोटच्या अल्पवयीन मुलीवर शारिरीक अत्याचार करणाऱ्या बापास पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार ३८ वर्षीय बापाला अटक केली आहे.