Pune : पुणेकरांना मोठा दिलासा ! लॉकडाऊन शिथिल करण्याबाबतचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून आदेश; जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यातील कोरोना(corona) रूग्णांची आकडेवारी पाहात रूग्ण संख्या कमी होत असताना दिसत असली तरी मृत्यू संख्येत घट होताना दिसत नाही. काही ठिकाणी कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव कमी झाला आहे पण काही ठिकाणी अद्यापही कोरोनाचा(corona) प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध 15 जून पर्यंत कायम ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल (रविवार) केली. मुख्यमंत्र्यांनी कमी रूग्णसंख्या असलेल्या ठिकाणी निर्बंध शिथिक करण्याबाबत स्थानिक प्रशासनास अधिकार बहाल केले होते. त्याच पार्श्वभुमीवर पुण्यातील कडक निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्याबाबतचे सविस्तर आदेश पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत.

Pune : कोरोना नियमांचे उल्लंघन ! भाजप आमदार महेश लांडगे यांच्यासह 60 जणांवर FIR

कडक निर्बंधांबाबत शिथिलता देण्यासाठी काढण्यात आलेला आदेश खालील प्रमाणे .

1. पुणे महापालिका क्षेत्रामध्ये कोविड-19 च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी मनपाकडील दि. 14 एप्रिल आणि दि. 28 मे रोजीच्या आदेशातील अत्यावश्यक सेवा मधील नमूद दुकाने ही आठवडयातील सर्व दिवस रोज सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील.

2. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व बँका कामाचे सर्व दिवस सुरू राहतील.

3. पुणे मनपा क्षेत्रातील अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील.

4. रेस्टॉरंट व बार हे फक्त पार्सल / घरपोच सेवेसाठी दि. 14 एप्रिल 2021 च्या आदेशानुसार सुरू राहतील.

5. पुणे मनपा क्षेत्रातील ई-कॉमर्स मार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू यांची घरपोच सेवा सुरू करण्यास मुभा राहणार आहे.

6. पुणे मनपा क्षेत्रात दररोज दुपारी 3 नंतर वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कारण / अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्णतः प्रतिबंध (संचारबंदी) राहील. तसेच घरपोच सेवा देण्यास यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार परवानगी असेल.

7. पुणे मनपा क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालय (अत्यावश्यक / कोरोना विषयक कामकाज करणार्‍या कार्यालयां व्यतिरिक्त) 25 टक्के अधिकारी / कर्मचारी उपस्थितीत सुरू राहतील.

8. कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरूस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवडयातील सर्व दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील.

9. पुणे मनपा क्षेत्रातील मद्य विक्रीची दुकाने आठवडयातील सर्व दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील.

10. वरील आदेशा व्यतिरिक्त इतर बाबींसाठी मनपाच्या दि. 14 एप्रिल, 17 एप्रिल, दि. 20 एप्रिल, दि. 22 एप्रिल, 30 एप्रिल, 14 मे आणि 28 मे 2021 रोजी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना लागू राहतील.

11. संदर्भीय आदेशान्वये वेळावेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

12. सदर आदेश दि. 1 जून 2021 पासून पुढील 10 दिवस पुणे मनपा कार्यक्षेत्रापर्यंत लागू राहतील. त्यानंतर कोविड पॉझिटिव्हीटी बाबतचा आढावा घेण्यात येईल. कोविड-19 पॉझिटिव्ह रूग्णसंख्येचे प्रमाण वाढल्यास त्याअनुषंगाने सुधारित आदेश निर्गमित करण्यात येतील.

संभाजीराजेंचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘सरकार माझ्यावर पाळत ठेवतंय, माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही’

Pune : ‘सीरम’कडून लस मिळत असतानाही भाजप पुणेकरांच्या जीवाशी का खेळतोय ? व्यवहार टक्केवारीसाठी अडलायं की अंतर्गत कलहामुळे – माजी आमदार मोहन जोशी