Pune : कोविशिल्ड लस घेण्यासाठी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद- नगरसेविका मनिषा लडकत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा ज्वर वाढत आहे, त्यामुळे नागरिक सैरभर झाले आहेत. त्यांना आधार देत कोविशिल्ड लस देण्यासाठी नागरिकांनी आधारकार्ड घेऊन नोंदणी करावी, असे आवाहन नगरसेविका मनिषा लडकत यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत मागिल चार दिवसांपासून 500 नागरिकांनी नोंदणी केली आहे. त्यांना बाई भिकाजी पेस्तनजी दवाखाना भारत टॉकीज, कै. मामासाहेब बडदे दवाखाना नाना पेठ येथे लस दिली जात आहे. 45 वर्षांपुढील सर्वांसाठी कोविशिल्ड लस दिली जात आहे.

लडकत म्हणाल्या की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करत लसीकरण मोहीम सुरू केली आहे. 45 वर्षांपुढील सर्वच नागरिकांनी लसीकरण सुरू केले आहे. लवकरच 18 वर्षे वयोगटापुढील सर्वांनाच लसीकरण केले जाणार आहे. सध्या तरी 45 वयोगटाच्या पुढील नागरिकांना लसीकरण केले जात आहे. स्वतःबरोबर इतरांच्या सुरक्षेसाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असेही त्यांनी सांगितले.