Pune : शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील ग्राऊंड कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘बंद’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजीनगर येथील पुणे पोलीस मुख्यालयातील ग्राऊंड कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केले आहे. पण, तरीही या बंद काळात दररोज सायंकाळी काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा गट फेरफटका मारण्यास येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असून, सरावासाठी ग्राऊंड बंद अन अधिकाऱ्यांना फेरफटका मारण्यास उघडे कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर त्याची जोरदार चर्चा देखील सुरू आहे. विशेष म्हणजे, एक अधिकारी होम क्वारटाईन आहेत. पण ते फेरफटका मारताना दिसत असल्याची माहिती आहे.

पोलीस मुख्यालयातील प्रशस्त मैदान आहे. याठिकाणी विविध खेळांचा सराव केला जातो. दररोज हे ग्राऊंड खुल असत. मात्र, सध्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे हे ग्राऊंड देखील बंद केला आहे. पोलीस प्रशासननाने काही दिवसांपूर्वी हा आदेश दिला आहे. सराव करण्यासाठी ग्राऊंड बंद असल्याने सराव करणारे काहीजण नाराज आहेत. त्यातच ग्राऊंड बंद असले तरी सायंकाळी मात्र वरिष्ठ अधिकारी येथे चालण्यास येतात. सामान्य पोलिसांना सरावासाठी ग्राऊंड बंद अन अधिकाऱ्यांसाठी खुल असल्याने पोलिसांनी नाराजी व्यक्त करत आहेत. ग्राऊंड बंद करायचे असेल, तर ते सर्वांसाठी करावे. नियम सर्वांना लागू असावा अशी अपेक्षाही व्यक्त केली.

होम क्वारटाईन अन फेरफटका
एक वरिष्ठ पोलीस अधिकारी या ग्राऊंडवर सायंकाळी नियमित येतात. ते फेरफटका मारतातही. सध्या हे अधिकारी होम क्वारटाईन असल्याची माहिती आहे. तरीही ते फेरफटका मारायला येतात, असे सांगण्यात आले आहे.