Pune वारज्यात ‘कोयते’धारी टोळक्याचा धुसगुस, तरुणावर हल्ला

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – वारजे माळवाडी भागात पुन्हा एकदा टोळक्याने राडा घालत हातात कोयते घेऊन आलेल्या या टोळक्याने परिसरात तुफान दहशत माजवत एका तरुणावर हल्ला केला. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी तिघांना अटक केली.

नितीन लक्ष्मण पदमाकर (वय २०, रा. रामनगर, वारजे), महादेव प्रल्हाद जावळे (वय २४, भवानी चौक, वारजे ) आणि मयूर सुरेश कुडले (वय १९, रा. वॅâनोल रस्ता वारजे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रोहित पोटे (वय २३, रा. कर्वेनगर) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी रोहित दुधाने लॉन्स परिसरात मित्रांसोबत गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी तेथे हातात कोयते घेउन आलेल्या नितीन, महादेव आणि मयूरने रोहितसह कुणाल साकला व आकाश वर्माला शिवीगाळ केली. तुम्हाला आमची भीती वाटत नाही का, आम्ही इथले भाई आहेत, तुला खल्लास करुन टाकू असे म्हणत त्यांनी रोहितवर उलट्या कोयत्याने मारहाण केली. त्याशिवाय दगड छातीत मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर परिसरात तुफान राडा घालत दहशत माजवली. आरोपींनी दोघा मित्रांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. पोटे यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी पोलिसांनी तिघांचा शोध घेतला. तसेच त्यांना पकडले. अधिक तपास उपनिरीक्षक व्ही. डी. जाधव करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like