Pune GST Department | खळबळजनक ! भंगार व्यावसायिकाने घातला घोळ, तब्बल साडेबारा कोटींचा जीएसटी बुडविला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune GST Department | बोगस कंपन्यांव्दारे सुमारे 70 कोटी 22 लाखांची खरेदीची बिले तयार करून शासनाचा कोटयावधींचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) बुडविणार्‍या एका भंगार व्यावसायिकाला पुण्याच्या जीएसटी विभागाने उत्तर प्रदेशामधून अटक केली आहे. परराज्यात जावून केलेली ही किंबहुना पहिलीच कारवाई आहे. (Pune GST Department)

सिराजुद्दीन कमालुद्दीन चौधरी (Sirajuddin Kamaluddin Chaudhary) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याची ओलायन डेस्कॉन इंडस्ट्रीयल नावाची कंपनी आहे. चौधरीने बनावट बिले सादर करून तब्बल 12 कोटी 59 लाखांचा जीएसटी कर बुडविला होता. त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने पुण्यातून पलायन केले होते. त्याच्या शोधासाठी पुण्याच्या जीएसटी विभागाच्या अन्वेषण शाखेने विशेष शोधमोहीम हाती घेतली. तो उत्तर प्रदेशातील त्याच्या मुळ गावी गेला असल्याची शक्यता असल्याने जीएसटी विभागाच्या अन्वेषण शाखेचे एक पथक उत्तर प्रदेशातील सिध्दार्थनगर जिल्हयातील (Siddharth Nagar in Uttar Pradesh) जबजुआ गावी गेले. तेथे त्याच्या घरावर सुमारे 3 दिवस नजर ठेवली. त्यानंतर युपी पोलिसांच्या (UP Police) मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. चौधरीला पुण्यात आणल्यानंतर त्यास न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Pune GST Department)

Web Title :- Pune GST Department | state gst departments pune unit nabs businessman in up for fraud

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur Crime News | म्हशीचा धक्का लागल्याने विहिरीत पडून 14 वर्षीय मुलीचा मृत्यू; कोल्हापूरमधील घटना

Subsidy For Onion | शेतकर्‍यांना दिलासा ! कांद्याला प्रतिक्विंटल 300 रूपये सानुग्रह अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Beed Accident News | वाहनाने दिलेल्या धडकेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या 70 वर्षीय आईचा मृत्यू

Oscar Awards 2023 | मिशेल योह ठरली उत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पटकावणारी आशियातील पहिली महिला