Pune Guardian Minister Chandrakant Patil | रोटरी तर्फे महिला उत्पादकांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी – चंद्रकांत पाटील

रोटरी क्लब ऑफ गांधी भवनच्या वतीने आयोजित कोथरूड शॉपिंग फेस्ट सुरू

पुणे : Pune Guardian Minister Chandrakant Patil | महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळाली नाही तर त्या खूप खचतात, आशा वेळी त्यांच्या प्रॉडक्टला ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचे काम रोटरी क्लब ऑफ गांधी भवनच्या वतीने कोथरूड शॉपिंग फेस्ट च्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून होत आहे. ही खूप चांगली बाब आहे. मात्र, वर्षातील काही दिवसच अशी सोय उपलब्ध करून देण्यापेक्षा रोटरी तर्फे महिला उत्पादकांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी. तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना यामध्ये प्राधान्यक्रमाने स्थान द्यावे, अशी अपेक्षा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Pune Guardian Minister Chandrakant Patil) यांनी व्यक्त केली.

सामाजिक दायितवाच्या जाणिवेतून महिला नव उद्योजिका आणि सेवाभावी संस्था यांना व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ गांधी भवनच्या वतीने कोथरूड शॉपिंग फेस्ट सीजन २ भरवण्यात आले आहे. याचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Pune Guardian Minister Chandrakant Patil) यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. अनिल परमार, डिस्ट्रिक्ट ऑफिसर आदी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच रोटरियन डॉ. ऋचा वझे – मोकाशी, रोटरी क्लब ऑफ गांधी भवनचे अध्यक्ष रोटरियन पद्मजा जोशी, सचिव रोटरियन अश्विनी शिलेदार, पुष्कर मोकाशी, शशांक टिळक, मनीष धोत्रे, दीपा पुजारी, प्रसाद पुजारी, अ‍ॅड. मंदार जोशी रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय निमंत्रक, अ‍ॅड. अर्चिता मंदार जोशी मा. सदस्य बार असोसिएशन आदी उपस्थित होते. हा शॉपिंग फेस्ट उद्या (दि. २८ मे ) पर्यंत सर्वांसाठी खुला असणार आहे.

डॉ. ऋचा वझे – मोकाशी यांच्या संकल्पनेतून या कोथरूड शॉपिंग फेस्ट ची सुरूवात झाली.
याविषयी माहिती देताना डॉ. ऋचा वझे – मोकाशी म्हणाल्या, सामाजिक कार्याला हातभार लावण्याच्या हेतूने
या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या शॉपिंग फेस्ट मध्ये १०० हून अधिक महिला
नव उद्योजिका सहभाग घेतला आहे. महिला उद्योजिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा हेतु आहे
यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी शॉपिंग फेस्ट ला भेट द्यावी असे आवाहन
त्यांनी केले.

रोटरी क्लब गांधी भवन मागील २२ वर्षांपासून कार्यरत असून या काळात क्लबने विविध सामाजिक कार्यात
सहभाग नोंदवला आहे. या उपक्रमाचे सुवर्ण प्रायोजक गंगोत्री हॉलिडे आणि होम्स,इव्हेंट प्रायोजक वासू इव्हेंट्स
तर पावर्ड बाय क्रिस्टल किया आणि खादी वर्ल्ड आहेत.

Web Title :  Pune Guardian Minister Chandrakant Patil | Permanent market should be made available to women producers by Rotary – Chandrakant Patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘सावरकर बनण्याची तुमची औकात नाही’, देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर घणाघाती टीका (व्हिडिओ)

Sambhajiraje Chhatrapati | स्वराज्य संघटना राज्यातील सर्व निवडणुका लढवणार, संभाजीराजेंची मोठी घोषणा (व्हिडिओ)

MP Supriya Sule | रखरखत्या उन्हात उभ्या प्रवाशांसाठी खासदार सुप्रिया सुळे मायेची पाखर होऊन धावल्या; बंद पडलेल्या शिवशाहीतील प्रवाशांना स्वतःच्या गाडीसह अन्य गाड्यांतून सावलीत हलवले (Video)