Pune Hadapsar Crime | बसची वाट पहात थांबलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हडपसर येथील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Hadapsar Crime | शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी बस स्टॉपवर बसची वाट पहात थांबलेल्या अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करुन विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.22) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास हडपसर येथील गाडीतळ बस डेपो (Gadital Bus Depo) येथे घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी अनोळखी तरुणांवर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे.(Pune Hadapsar Crime)

याबाबत लोणी काळभोर (Loni Kalbhor) येथे राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यारुन 16 ते 18 वयोगटातील चार अनोळखी तरुणांवर आयपीसी 354, 354(अ), 352, 504 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित तरुणी तिच्या मैत्रिणींसोबत गाडीतळ बस डेपो येथे लोणी काळभोर येथे जाण्यासाठी बसची वाट पहात थांबली होती. त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांनी मुलीला अश्लील स्पर्श करुन विनयभंग केला. मुलीने आरोपींना शिवीगाळ केली. याचा राग आल्याने आरोपी तिच्या अंगावर धावून आले. तसेच फिर्य़ादी व तिच्या मैत्रिणींना शिवीगाळ केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पाठलाग करुन विनयभंग

हडपसर : कॉलेज तरुणीचा वारंवार पाठलाग करुन तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करुन विनयभंग केला.
हा प्रकार फुरसुंगी येथील एका कॉलेजमध्ये जुलै 2023 पासून 21 फेब्रुवारी दरम्यान घडला आहे. याप्रकरणी भेकराईनगर येथे राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन फुरसुंगी येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर आयपीसी 354, 354(अ), 354(ड), 504, 506 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक वर्षा डोंगरे (API Varsha Dongre) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Pune Police MCOCA Action | माथाडी बोर्डाचे नेते असल्याचे सांगून खंडणी मागणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’

येरवडा येथे साकारणार शिवगर्जना महानाट्य ! छत्रपती शिवाजी महाराज यांचा धगधगता इतिहास मांडणार, 24 ते 26 फेब्रुवारीला आयोजन