Pune Hadapsar Crime | नराधम बापाचा पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, हडपसर भागातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Hadapsar Crime | बापानेच आपल्या पोटच्या 14 वर्षाच्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरात (Hadapsar Police Station) घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी नराधम बापावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार सोमवारी 26) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीच्या घरात घडला आहे. (Pune Rape Case)

याबाबत 14 वर्षीय पीडित मुलीने मंगळवारी (दि.27) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन 35 वर्षीय बापावर आयपीसी 376, 376/2/क/क्ष, 354 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पीडित मुलगी घरात एकटी असताना आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

महिला पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा हमालीचे काम करतो तर आई
गृहिणी आहे. सोमवारी सकाळी फिर्यादीची आई कामानिमत्त बाहेर गेल्याने घरात आरोपी आणि मुलगी दोघेच घरात होते.
आरोपीने अचानक तिच्याजवळ जाऊन तिच्या शरीराला अश्लील स्पर्श करुन तिच्यासोबत लैंगिक चाळे केले.
त्यानंतर मुलीचे तोंड दाबून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
घाबरलेल्या मुलीने हा प्रकार आईला सांगितल्यानंतर तिने मुलीला घेऊन हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Mundhwa Police | पार्कींग केलेल्या रिक्षांचे डिस्कटायर चोरणाऱ्यांना मुंढवा पोलिसांकडून अटक

Manoj Jarange Patil On Maharashtra Govt | ‘सरकारने शिष्टमंडळ पाठवून फसवणूक केली, महाराष्ट्रभर गुन्हे दाखल करू’ – मनोज जरांगे

PM Modi Yavatmal Visit | PM मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, ‘या’ जिल्ह्यात महिला मेळाव्यासह विविध कार्यक्रम, PM Kisan च्या १६ व्या हप्त्याचे वितरण करणार

Amit Shah On Uddhav Thackeray | अमित शाह यांची इंडिया आघाडीवर जोरदार टीका, उद्धव ठाकरेंना त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असे वाटते…

Sanjay Raut On Amit Shah | अमित शहांच्या घराणेशाहीच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर, ”जय शाहने विराट कोहलीपेक्षा जास्त सिक्सर्स मारलेत का?”