Pune Hadapsar Crime | कारला धक्का देऊन गाडीची तोडफोड, हडपसर परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Hadapsar Crime | दुचाकीवरील तिघांनी कारला धडक देऊन कार चालकाला शिवीगाळ करुन कारच्या काचांची तोडफोड केली. हा प्रकार गुरुवारी (दि.22) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हडपसर परिसरातील मगरपट्टा (Magarpatta) येथील ब्रीजकडे जाणाऱ्या रोडवर घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) दुचाकीवरील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत जुनेद गुलाबनबी अहमद (वय-26 रा. अॅमनोरा फ्युचर टॉवर, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून लाल रंगाच्या होंडा डिओ मोपेडवरील तीन अनोळखी तरुणांवर आयपीसी 324, 323, 352, 506, 427, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या कारमधून मगरपट्टा येथून मुंढवा ब्रीजकडे जात होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांच्या गाडीला धक्का मारुन हॉर्न वाजवला. याबाबत फिर्य़ादी यांनी आरोपींकडे विचारणा केली. त्यावेळी आरोपी फिर्य़ादी अंगाच्या अंगावर धावून आले. त्यांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच दगडाने फिर्यादी यांच्या गाडीची काच फोडून नुकसान केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.(Pune Hadapsar Crime)

धारदार हत्याराने तरुणाला मारहाण

सिंहगड रोड : मित्रासोबत बोलत थांबलेल्या तरुणाला व त्याच्या मित्राला काहीही कारण नसताना तिन जणांनी धारदार हत्याराने मारहाण करून जखमी केले. हा प्रकार नऱ्हे येथील सौरभ अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास घडला. याबाबत सागर शांताराम शिर्के (वय-23 रा. नऱ्हे) याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन महेश उबाळे, बुट्या भोसले यांच्यासह एका अनोळखी तरुणावर आयपीसी 324, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Executive Engineer Kiran Deshmukh Suspended | पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख निलंबित, जाणून घ्या कारण

Pune Navale Bridge Accident | पुणे: नवले पुलाखाली विचित्र अपघात; 8 ते 9 वाहने एकामेकांना धडकली (Video)

PM Narendra Modi In Yavatmal | पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये, लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता

Sanjay Raut On BJP | राऊतांचा मोठा दावा, दोन्ही गटांना नड्डांनी सांगितले की, ”धनुष्यबाण, घड्याळाला लोक मतदान करणार नाहीत, त्यामुळे…”

Pune NCP News | प्रशांत जगताप यांच्यासह शरद पवार गटाच्या 9 जणांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण (Videos)

बसची वाट पहात थांबलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हडपसर येथील प्रकार