Pune Hadapsar Crime | खुनाचा प्रयत्न करुन पळून गेलेल्यानेच आणखी एक खून केल्याचे उघड

पुणे : Pune Hadapsar Crime | जुन्या भांडणाच्या कारणावरुन धारदार हत्याराने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) करुन पळून गेलेल्याला हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) पकडले. त्याच्या चौकशीत त्याने या घटनेच्या अगोदर खराडीमध्ये आणखी एकावर गळ्यावर वार करुन खून केल्याचे उघड झाले. (Pune Murder Case)

शुभम काकासाहेब निचळ (वय २५, रा. होळकरवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भाऊसाहेब सुभाष काळे (वय ४१, रा. साईप्रभा सोसायटी, शिवणे, वारजे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ३८७/२४) दिली आहे. या घटनेत फिर्यादी यांचा भाऊ राहुल काळे (वय ३८) हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना १ मार्च रोजी रात्री दहा वाजता मगरपट्टा सिटी येथील कॉसमोस सोसायटीखाली झाली होती.

आरोपी आणि फिर्यादी यांचा भाऊ राहुल काळे हे एकमेकांचे दूरचे नातेवाईक आहेत. ज्यांच्यात पूर्वी भांडणे झाली होती. जुन्या भांडणाच्या कारणावरुन शुभम याने राहुल याच्या गळ्यावर वार करुन गंभीर जखमी करुन तो पळून गेला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे (Sr PI Santosh Pandhare) यांनी दिलेल्या सुचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे (API Arjun Kudale) , पोलीस अंमलदार अतुल पंधरकर, अमोल दणके हे आरोपीचा शोध घेत असताना तो हांडेवाडी येथे सापडला. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने या प्रकाराच्या अगोदर खराडी (Kharadi) येथे आणखी एकावर वार करुन त्याचा खून केल्याचे सांगितले. चंदननगर पोलीसही (Chandakn Nagar Police) त्याचा शोध घेतल्याचे समोर आले.

बाळु ऊर्फ बाळकृष्ण धनाजी कांबळे (वय ३३, रा. थिटे वस्ती, खराडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. ही घटना खराडी येथील रिव्हरडेल सोसायटीजवळ १ मार्च रोजी दुपारी अडीच ते सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या दरम्यान घडली होती.

शुभम निचळ आणि बाळु कांबळे हे पूर्वी एकाच ठिकाणी कामाला होते. तेथे त्यांचा पूर्वी वाद झाला होता. या भांडणाचा राग मनात धरुन त्याने बाळु याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खून करुन तो पळून हडपसरला गेला होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पंडीत रेजितवाड (PI Pandit Rejitwad) यांच्या सूचनेनुसार, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे (PSI Mahesh Kavle), पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर, सचिन गोरखे, अमोल दणके, चंद्रकांत जेजितवाड, अमित साखरे, कुंडलीक, केसकर, रामदास जाधव या पथकाने ही कामगिरी केली. सहायक पोलीस निरीक्षक दीपक बर्गे (API Deepak Barge) अधिक तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पिंपरी : ओव्हरटेक करताना पिकअप वाहनाची दोन दुचाकींना धडक, एकाचा मृत्यू