Pune Hadapsar Crime | पुणे : कुत्र्याच्या अंगावर पाणी टाकल्याच्या कारणावरुन महिलेला मारहाण, चार जणांवर विनयभंगाचा गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Hadapsar Crime | पाण्याच्या हंड्यात कुत्र्याने तोंड घातल्याने महिलने त्याच्या अंगावर पाणी टाकले. याचा राग आल्याने चार जणांनी महिलेच्या मुलाला शिवीगाळ करुन दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच महिलेचे केस धरुन तिच्यासोबत अश्लील वर्तन करुन विनयभंग (Molestation Case) केला. हा प्रकार हडपसर परिसरातील साडेसतरा नळी येथील दांगट वस्ती येथे मंगळवारी (दि.20) दुपारी बाराच्या सुमारास घडला आहे. (Pune Hadapsar Crime)

याबाबत दांगट वस्ती येथे राहणाऱ्या 49 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन दिलीप बाबुराव जाधव (वय-66), शुभम दिलीप जाधव (वय-28), शंभो दिलीप जाधव (वय-24) शुभम जाधव याचा अनोळखी मित्रावर आयपीसी 354, 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्याद एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी यांच्या पाळीव कुत्र्याने फिर्यादी यांनी पाण्याने भरुन ठेवलेल्या हंड्यात तोंड घातले. कुत्र्याला हाकलण्यासाठी फिर्यादी यांनी कुत्र्याच्या अंगावर पाणी टाकून कुत्र्याला बांधून ठेवा असे आरोपींना सांगितले. याचा राग आल्याने आरोपी यांनी फिर्यादी यांच्या मुलाला शिवीगाळ करुन हाताने व दगडाने मारहाण करुन धमकी दिली. तसेच फिर्यादी यांचे केस धरून ओढत स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

किरकोळ वादातून थेऊर येथे चाकुने वार

लोणी काळभोर : दुपारी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरुन एका तरुणाने घरात घुसून एका व्यक्तीला हाताने मारहाण करुन चाकू सारख्या हत्याराने तोंडावर मारुन जखमी केले. हा प्रकार सोमवारी (दि.19) दुपारी तीन ते साडे तीन वाजण्याच्या सुमारास थेऊर येथील काळेवस्ती येथे घडला आहे. याबाबत राज सागर इंगळे (वय-19 रा. काळेवस्ती, थेऊर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बाबुलाल विपतीलाल बगेल (वय-45 रा. काळेवस्ती, थेऊर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Yugendra Pawar | अजितदादांच्या विरोधात सख्खा पुतण्या मैदानात, युगेंद्र पवार म्हणाले, ”पवार साहेब म्हणतील तसं…”

Manoj Jarange Patil | भुजबळांचा खबऱ्या जरांगेंच्या गोटात? मनोज जरांगेंनीच दिली माहिती, म्हणाले ”हा घातपाताचा प्रकार…”

Solapur Rural Police | एमडी ड्रग्स प्रकरणातील आंतर राज्य टोळीचा मुख्य सूत्रधार सोलापूर पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून मेफेड्रॉन जप्त, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : कोंढव्यात घरकाम करणाऱ्या मुलीवर बलात्कार

पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती गॅस छोट्या सिलेंडरमध्ये भरुन चोरी; लोखंडी पिनद्वारे करत होता गॅस ट्रान्सफर

पुणे : घरच्यांना मारुन टाकण्याची धमकी, ट्यूशनला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत भररस्त्यात गैरवर्तन