Pune Hadapsar Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, हडपसर भागातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Hadapsar Crime | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तरुणीच्या इच्छेविरोधात शारीरिक संबंध ठेवून फसवणूक केल्याचा प्रकार हडपसर भागात घडला आहे (Pune Rape Case). याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2022 ते डिसेंबर 2023 या कालावधीत पुणे-सोलापूर हायवेवरील लॉजवर व पीडित तरुणीच्या घरात घडला आहे.

याबाबत काळेपडळ येथे राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीने मंगळवारी (दि.27) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यावरुन साहिल अविनाश घुले Sahil Avinash Ghule (वय-25 रा. हडपसर, पुणे) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन,
504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Hadapsar Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या परिचयाचे आहेत.
आरोपीने मुलीसोबत जवळीक साधून तिला लग्न करणार असल्याचे आमिष दाखवले.
त्यानंतर तिला पुणे-सोलापूर महामार्गावरील लॉजमध्ये नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
तसेच पीडित मुलीच्या घरात कोणी नसताना घरी येऊन अत्याचार केले.
फिर्यादी यांनी लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला.
तसेच शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात
फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Modi Yavatmal Visit | PM मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, ‘या’ जिल्ह्यात महिला मेळाव्यासह विविध कार्यक्रम, PM Kisan च्या १६ व्या हप्त्याचे वितरण करणार

Amit Shah On Uddhav Thackeray | अमित शाह यांची इंडिया आघाडीवर जोरदार टीका, उद्धव ठाकरेंना त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असे वाटते…

Sanjay Raut On Amit Shah | अमित शहांच्या घराणेशाहीच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर, ”जय शाहने विराट कोहलीपेक्षा जास्त सिक्सर्स मारलेत का?”