Pune Hadapsar News | महिलांनी नियमित व्यायाम करावा, स्थूलता टाळावी व आरोग्यपूर्ण सकस आहार घ्यावा; प्रयास संस्थेच्या डॉ.तृप्ती धारपोवार यांचे आवाहन

पुणे : Pune Hadapsar News | महिलांनी नियमित व्यायाम करावा. स्थूलता टाळावी व आरोग्यपूर्ण सकस आहार घ्यावा. विशेषता बाळाला स्तनपान केलेल्या मातांमध्ये स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण कमी आढळते. गर्भपिशवीच्या तोंडाचा कॅन्सर टाळण्यासाठी मुलींसाठी एचपीव्हीची लस व तीस वर्षांपुढील स्त्रियांनी गर्भपिशवीच्या तोंडाची कॅन्सर तपासणी करून घ्यावी. कॅन्सरचे निदान झाल्यास घाबरून जाऊ नये. वेळेत औषधोपचार घेतल्यास रुग्ण लवकर बरा होतो. आरोग्याबाबत काही शंका असल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. असे आवाहन प्रयास संस्थेच्या डॉ.तृप्ती धारपोवार यांनी केले. (Pune Hadapsar News)
हडपसर शिवसमर्थ संस्थेने ब्रम्हांड संस्थान व प्रयास संस्थेच्या विशेष सहकार्याने स्तनाचा व गर्भाशयाच्या कॅन्सरचे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी डॉ.तृप्ती धारपोवार बोलत होत्या.यावेळी ब्रह्मांड संस्थांनचे चारूहास रेडकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सचिन देशपांडे, सावी संस्थेच्या विद्या होडे,सुनंदा देशमुख, शिबिराच्या आयोजक शिवसमर्थच्या अध्यक्षा मनीषा वाघमारे व उपाध्यक्षा आदिरा देशमुख उपस्थित होते. या शिबिरामध्ये ४० महिलांच्या गर्भाशय कॅन्सरची व ३२ महिलांची स्तनाच्या कॅन्सरची तपासणी केली. (Pune Hadapsar News)
आपले आरोग्य आपल्या स्वतःच्या हाती असून, महिलांनी स्वतःसाठी वेळ द्यावा.
त्यांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.कारण त्या कुटुंब संस्थेचा पाया आहेत.
स्तनाच्या व गर्भाशयाच्या कॅन्सरचे योग्य वेळी निदान होणे गरजेचे आहे.
अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध असल्यामुळे, उपचाराद्वारे अनेक रुग्ण आता निरोगी जीवन व्यतीत करीत आहेत.
असा सल्ला डॉ.तृप्ती धारपोवार यांनी दिला. प्रास्ताविक मनीषा वाघमारे यांनी,आभार विद्या होडे व आदिरा देशमुख यांनी मानले.
Web Title :- Pune Hadapsar News | Women should exercise regularly, avoid obesity and eat a healthy diet; Appeal by Dr. Tripti Dharpowar of Prayas Sanstha
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update