Pune : कोयत्याच्या धाकानं लुटणार्‍या टोळीला हडपसर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  हडपसर, कोंढवा, वानवडी परिसरात दिवसाढवळ्या कोयत्याच्या धाकाने जबरी चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरी करणाऱ्या तिघांसह एका विधी संघर्षित बालकाला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, महागडे मोबाईल, मोटारसायकल, एलसीडी टीव्ही असा चार लाख 68 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अभिजित ऊर्फ दाद्या अशोक रणदिवे (वय 21), सतीश अण्णाजी केदळे (वय 32, दोघे रा. म्हाडा कॉलनी, हडपसर), नोएल ऐलेन शबान (वय २०, रा. कोरेगाव पार्क, बंडगार्डन) अशी अटक केलेल्या तिघांना अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १५ मे) मगरपट्टा सिटीमध्ये ज्येष्ठ नागरिकाची दोन तोळ्याची सोन्याची चेन दोन अज्ञात चोरट्याने चोरून नेली, त्यानंतर मंगळवारी (दि. १८) रोजी भोसले गार्डन येथे मॉर्निंग वॉक करताना ज्येष्ठ महिलेला करणाऱ्या कोयत्याच्या धाकाने गळ्यातील सोन्याची चैन चोरून नेली, त्याच दिवशी बी. टी. कवडे रोड येथे टेम्पोचालकाला कोयत्याने टेम्पोची काच फोडून, चालकाचा मोबाइल व रोख रक्कम चोरट्याने चोरून नेली होती. तिन्ही गंभीर घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण होते. वरिष्ठांच्या सूचनेनुसार हडपसर पोलीस ठाण्यातील तीन पथकांकडून गुन्ह्याचा तपास सुरू केला. त्यावेळी पोलीस शिपाई शाहिद शेख, शशिकांत नाळे यांना तिन्ही आरोपींची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार सापळा रचून म्हाडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तिन्ही आरोपींना पकडले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी तिन्ही गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून सोन्याचे दागिने, महागडे मोबाईल, मोटारसायकल, एलसीडी टीव्ही असा ऐवज जप्त करण्यातआला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड करीत आहेत.

अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजू अडागळे, दिगंबर शिंदे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षीरसागर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, शाहिद शेख, अकबर शेख, शशिकांत नाळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे यांच्या पथकाने ही कारवाई केली.