पुणे : सराईत गुन्हेगार हडपसर पोलिसांच्या ‘जाळ्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात घरफोड्या, वाहन चोऱ्या तसेच पीएमपीएल बसमध्ये प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या सराईताला हडपसर पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून ५ लाख १० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी (वय.२०,रा.सटवाईनगर मांजरी बुद्रुक) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

दुधानी सराईत असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. हडपसर येथील पांढरे मळा कॅनाॅलशेजारी असलेल्या रस्त्यावर नंबर नसलेल्या दुचाकीवर एकजण लोकांना सोन्याचे दागिणे विक्री करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती कर्मचारी नितीन मुंढे व विनोद शिवले यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसराची पाहणी करून सापळा रचून दुधानीला ताब्यात घेतले. अधिक चौकशीत दुधानीविरुद्ध २० गुन्हे दाखल असून त्याचे वडील अर्जुनसिंग दुधानी हा देखील सराईत घरफोड्या करणारा गुन्हेगार आहे. सध्या तो मोक्काअंतर्गत येरवडा कारागृहामध्ये बंदीवान आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस निरीक्षक हमराज कुंभार यांनी केली.

त्याच्यकडून सोन्याचे मंगळसुत्र, गंठण, नेकलेस, साखळी, रिंगा असा ९५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे आणि दुचाकी मिळून तब्बल 5 लाख 10 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.


चंदननगर बसस्थानकातून सराईत अटकेत

शहरातील विविध भागात पीएमपीएल बसस्थानकात गर्दीचा फायदा घेउन प्रवाशांच्या ऐवजाची चोरी करणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून ६७ हजारांची रोकड जप्त करण्यात आली. सचिन सिधराम गायकवाड (रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध असलेले ५ गुन्हे दाखल उघडकीस आणण्यात आले आहेत.

ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, सय्यद, साळुंखे, साबळे, खुनवे यांच्या पथकाने केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/