खाकी वर्दीतही माणुसकी ! हडपसर पोलिसांचे कौतुकास्पद कार्य

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  – खाकी वर्दीतही माणुसकीचा झरा असतो, हे वारंवार पोलीस खात्यातील मंडळींनी दाखवून दिले आहे. कठीण प्रसंगी कठोर भूमिका घ्यावी लागते. मात्र, त्यातही जनतेचे हित असते हे विसरून चालणार नाही. कठोर भूमिका घेत असताना जनसामान्य आणि भुकेल्यांचा आधार बनणारा महाराष्ट्र पोलीस कायम अग्रेसर आहे, हे हडपसर पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवून दिले आहे.

हडपसरमधील वृद्ध आणि विधवा 300 महिलांना भाजीपाल्याचे कीट दिले. तसेच, हडपसर पोलीस स्टेशनच्या वतीने 21 गरिब आणि अपंग कुटुबांना किराणा मालाचे साहित्य उपलब्ध करून दिले. हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश साठे, पोलीस निरीक्षक हमराज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, रमेश साबळे, प्रशांत नरसाळे, अमित कांबळे, अनिल कुसाळकर आणि ज्ञानेश्वर चित्ते यांनी गरजूंना धान्य दिले.