Lockdown : कॅन्सरग्रस्त निवृत्त लष्करातील जवानासाठी पोलिसच बनले ‘देवदूत’

पुणे : प्रतिनिधी – मांजरी ग्रून वूड येथे कॅन्सरग्रस्त वयस्कर निवृत्त आर्मीतील व्यक्तीने औषधासाठी हडपसर पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन माहिती घेत त्यांना औषधे मिळवून दिली. औषधे मिळाल्यानंतर निवृत्त आर्मी आर. सिन्हा यांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून देत तुमचे आभार कसे मानू असे भावूक उद्गार काढले, अशी माहिती हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी दिली. साठे म्हणाले की, कॅन्सरग्रस्त आर्मी रिटायर्ड आर. सिन्हा (रा. मांजरी ग्रीन वूड, ता. हवेली) असे त्यांचे नाव आहे.

साठे यांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस शिपाई अनिल कुसाळकर, पोलीस शिपाई ज्ञानेश्वर चित्ते आणि पोलीस मित्र राहुल तुपे यांनी कॅन्सरग्रस्त सिन्हा यांची माहिती घेऊन त्यांना मदत करण्यास सांगितले. त्यानुसार लोणारे यांनी सिन्हा यांना फोन करून माहिती घेतली, तर त्यांनी सांगितले की, माझ्यासाठीची औषधे फक्त केंद्रीय स्वास्थ्य केंद्र, स्वारगेट येथे रविवार वगळता इतर दिवशी मिळतात. सुमारे सहा लाख रुपये किमतीची औषधे असल्याची माहिती दिली. त्यानंतर लोणारे यांनी लगेच स्वारगेट येथे धाव घेतली. मात्र तेथील डॉक्टरांनी औषधे स्टाफकडे देण्यास नकार दिला. औषधे फक्त रुग्णाकडेच दिली जातील.. मात्र, येथे फक्त संबंधित व्यक्तीलाच औषधे दिली जातात. दरम्यान, ते एकटेच असून, आजारी आहेत, त्यामुळे त्यांना औषधाची गरज आहे, बाहेर लॉकडाऊन आहे, अशी परिस्थिती सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी सिन्हा यांच्या परवानगीच्या सहीचे पत्र घेऊन या, त्यानंतर औषधे देतो, असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ सिन्हा यांच्या सहीचे पत्र आणले, त्यानंतर त्यांनी औषधे दिली. ती तात्काळ सिन्हा यांच्याकडे सुपूर्द केली. त्यावेळी सिन्हा भावूक आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले, पोलीस वर्दीत असलो तरी गरजूंना वेळीच मदत कऱण्याचे काम करण्याचे व्रत आम्ही हाती घेतले आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी सांगितले.
फोटो