पुण्यातील ‘हेल्प रायडर्स’ घेणार एक ‘पूरग्रस्त’ गाव ‘दत्तक’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – रुग्णवाहिकांना मार्ग करू देताना अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी समाजमाध्यमावरून एकत्र आलेल्या विविध क्षेत्रातील तरुणांच्या हेल्प रायडर्स या ग्रुपने सांगली जिल्हयात पूरग्रस्त भिलवडी, पुणदी, अंकलकोप, आमनापूर यासह सहा गावांमध्ये सुसज्ज रुग्णवाहिकेसह वैद्यकीय सेवा राबवून एक हजार एकशे सत्तर पूरग्रस्तांना औषधोपचार केले, तसेच पुनर्वसन केंद्रात जीवनावश्यक वस्तूंची मदत करून दोन दिवस पूरग्रस्त भागात मदत कार्य केले. पुण्यासह औरंगाबादमधील सदस्यांनी पुरग्रत भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुणदी हे गाव दत्तक घेण्याचे ठरविले असून या गावातील विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य लवकरच पुरवले जाणार आहे.
Help-Riders

सांगली जिल्ह्यात महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या भिलवडी, पुणदी, अंकलकोप, आमनापूर ,नागराळे या गावांमधील पुरग्रस्तांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यासाठी हेल्प रायडर्सतर्फे डॉक्टरांचे पथक व रुग्णवाहिका या भागात पाठविण्यात आली. पाण्याचा वेढा असणाऱ्या ;पण घरातून बाहेर पडू न शकणाऱ्या पुरग्रस्तांपर्यंत तांदूळ, डाळ, पिण्याचे पाणी , मेणबत्या , काडीपेटी, बिस्किटे, ब्लँकेट्स, गुडदाणी आधी साहित्य स्थानिकांच्या मदतीने पोहचवले. तसेच ट्रॅक्टरद्वारे डॉक्टरांचे पथक पाठवून पुरग्रस्तांवर प्राथमिक उपचार करण्यात आले.
Help-Rider6
पलूसजवळील भिलवडीलगत असणाऱ्या खंडोबाचा माळ या पुनर्वसन केंद्रात तांदूळ, गहू आदी वस्तूंची मदत देण्यात आली.पूरग्रस्तांना मोठ्याप्रमाणावर येणाऱ्या मदतीमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीही हेल्प रायडर्सच्या सदस्यांनी अनेक ठिकाणी कार्य केले.या मदत कार्यात हेल्प रायडर्सचे मुख्य समन्वयक प्रशांत कनोजिया,अजित जाधव, सचिन पवार , श्रीकांत कापसे, अनुपम शहा,प्रशांत महानवर ,बाळासाहेब अहिवळे, संतोष पोळ, बाळासाहेब ढमाले , सुदिन जायाप्पा, बाळा जगताप ,विशाल धुमाळ ,विनायक मुरुडकर, प्रसाद गोखले, महेश चिले, प्रवीण पगारे ,संतोष वरे, संदीप करपे, महेंद्र जाधव यांच्यासह औरंगाबादचे संदीप कुलकर्णी ,अक्षय बाहेती आणि सदस्यांनी सहभाग घेतला. डॉ. रोहित बोरकर, डॉ. निखिल शेंडकर, डॉ. पूजा कणके व पथकांनी पुरग्रस्तांवर प्राथमिक उपचार केले. पलूस येथील प्रमोद देशमुख व डॉ देशमुख यांचेही या उपक्रमाला सहकार्य लाभले.
Help-Riders-3

मुख्यमंत्र्याना आवाहन
पुरग्रत नागरिकांचे पुनर्वसन होईल ;पण पूरग्रस्तबाधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य पुराच्या पाण्यात भिजले आहे, वाहून गेले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पूरग्रस्त भागातील शाळांमधील पटसंख्यानुसार विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध करून देण्याचे आवाहन हेल्प रायडर्सचे मुख्य समन्वयक प्रशांत कनोजिया यांनी केले आहे.
Help-Riders2
तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यासाठी पुणदी गाव दत्तक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे . त्यासाठी स्थानिक आमदार विश्वजित कदम यांच्याशीही चर्चा करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त