तळेगाव दाभाडे येथे २०० किलो गांजासह स्कोडा कार जप्त

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन

तळेगाव दाभाडे येथे २०० किलो गांजासह स्कोडा कार असा एकूण २० लाख रुपयांचा मुद्देमाल पुणे ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे. रात्रीच्या पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांना रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या संशयास्पद वाहनांची तपासणी केली असता हा गांज्याचा साठा आढळून आला.

याबाबत सविस्तर वृत असे की, ग्रामीण पोलीस दलाचे पोलिस उपनिरीक्षक नितीन मोहिते व त्यांचे सहकारी रात्री साडेतीनच्या सुमारास परिसरामध्ये गस्त घालत असताना रस्त्याच्या कडेला संशयास्पद वाहन उभा असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी शासकीय वाहन येत असल्याचे पाहून दोन इसमांनी गाडी सोडून पळ काढला. गाडी संशास्पद वाटल्यामुळे मोहिते व त्यांच्या सहकार्यांनी गाडीची पाहणी केली तेव्हा गाडीच्या मागच्या सीटवर तब्बल 200 किलोच्या गांज्याचे पॅकेट असलेली कॅरीबॅग आढळून आली.

सदर प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकारी पोलीस निरीक्षक मुगुट पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीष दिघावकर यांना देण्यात आली असता, त्यांनी गाडीची पाहणी करुन गुन्ह्यातील गाडी आणि 200 किलो गांज्याचा साठा पंचासमोर जप्त केला.

सदरची करवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक सुवेज हक, अप्पर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणपतराव माडगुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन मोहिते, कर्मचारी बंडु मारणे, नितीन गार्डी, आतिष जाधव, संतोष मोरे, रामदास बहिरट, महेंद्र रावते, श्रीकांत गायकवाड, अजित काळे आदि कर्मचार्‍यांनी ही कामगिरी पार पाडली.