पुणे : उच्च शिक्षित तरुणाकडून लाखो रुपयांच्या महागड्या दुचाकी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

नामांकीत कृषी विद्यापीठात कृषी शाखेच्या चौथ्या वर्षात शिकणाऱ्या तरुणाकडून पुणे गुन्हे शाखेच्या गुंडा स्कॉड पश्चिम विभागाने पाच लाखांच्या बारा महागड्या दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई पथकाने १० सप्टेंबर रोजी केली असून आरोपीला रत्नागिरी जिल्ह्यातून अटक केली. अटक केलेल्या आरोपीने पुण्यासह राज्यातील इतर शहरांमध्ये वाहन चोरीचे ४५ पेक्षा जास्त गुन्हे केले आहेत.
[amazon_link asins=’B00TFGWAA8,B01FXJI1OY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2e20642a-b827-11e8-85d9-8dd7f0615d17′]

अमरनाथ ज्ञानेश्वर घुलेश्वर (वय-२१ रा. मुपो खळी. ता. गंगाखेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुन्हे शाखेच्या संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक पथक पश्चिम विभागाचे पोलीस हवालदार संतोष क्षीरसागर यांना घुलेश्वर हा पुण्यातून वाहन चोरी करुन त्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. पथकाने सावर्डे घुलेश्वरची माहिती काढून त्याला ताब्यात घेतले. ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत त्याने कोंढवा, हडपसर, कात्रज देहुरोड, सायन मुंबई, ठाणे भागातून दुचाकी चोरल्या असल्याची कबुली दिली. घुलेश्वरन तब्बल  ४५ पेक्षा जास्त दुचाकी चोरल्याची कबुली दिली. चोरलेल्या दुचाकींची विक्री केल्याचे ही त्यान चौकशीत सांगितले.

चोरलेली दुचाकी घेऊन तो चिपळुन रत्नागिरी येथे जात होता. त्या ठिकाणी दुचाकींची विक्री करत होता. वाहन विकताना कागदपत्रांची मागणी केल्यास त्यांना कागदपत्र हरवल्याचे किंवा नंतर देतो असे सांगत होता. हिरो होंडा सीबीझेड, दोन हिरो इग्नेटर, चार स्प्लेंडर, पॅशन प्रो, युनिकॉर्न अशा पाच लाखांच्या बारा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या दुचाकी त्याने कोंढवा, स्वारगेट, देहुरोड, पनवेल, पाटण, ठाणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्या असून बारा गुन्हे उघडकीस आणण्यात पथकाला यश आले आहे.
[amazon_link asins=’B06Y5L25M4,B006RHKER4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’387866e0-b827-11e8-9102-81ac9741595a’]

दुचाकी चोरी करण्याची पद्धत
आरोपी हा नामांकित कृषी विद्यापीठामध्ये चौथ्या वर्षात शिकत आहे. दुचाकी चोरण्यासाठी बनावट चावीचा तो वापर करत होता. बनावट चावीने कुलुप उघडून दुचाकी चोरून नेत होता. त्याच्याजवळ आठ बनावट दुचकींच्या चाव्या पोलिसांना सापडल्या आहेत. दुचाकी चोरल्यानंतर तो दुचाकीचा मुळ नंबर त्याचे मोबईलमधील वाहन इन्फो या अॅपवर टाकुन दुचाकीची माहिती घेत होता. दुचाकी कोणत्या वर्षातील आहे याची माहीत घेऊन तो ओएलएक्स वर विक्रीसाठी असलेल्या त्याच वर्षातील दुचाकींची माहिती घेऊन ओएलएक्स वरील दुचाकीचा नंबर चोरलेल्या दुचाकीवर टाकत होता. त्यानंतर त्या दुचाकीची विक्री करीत होता. अशाच पद्धतीने त्याने अनेक दुचाकींची विक्री केल्याचे तपासात समोर आले आहे. काहीवेळा दुचाकी चोरल्यानंतर दुचाकीतील पेट्रोल संपल्यानंतर दुचाकी त्याच ठिकाणी सोडून देत होता. तसेच दुचाकी चोरताना सीसीटीव्ही असेल तर दुचाकी सोडून निघून जात होता. अशा पद्धतीने त्याने अनेक दुचाकी चोरल्या आहेत.
[amazon_link asins=’B00NFJGUPW,B073JPC6R3′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3e946d84-b827-11e8-b37f-492d8c9ed1f7′]

आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आठवे न्यायालय एस.एस. मतकर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला १५ सप्टेबर पर्य़ंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा प्रदिप देशपांडे, गुन्हे शाखेच पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, गुन्हे -१ चे सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा स्कॉड पश्चिम विभागाचे पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड, उत्तम बुदगुडे, पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर, सर्फराज शेख, प्रशांत पवार, शकील शेख, सुनिल चिखले, निलेश शिवतरे, रमेश चौधर, विजय गुरव राकेश खुणवे, किरण ठवरे, प्रविण पडवळ, कैलास साळुंके, संभाजी गंगावणे यांच्या पथकाने केली.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.