हिंजवडीत तलावात बुडून संगणक अभियंत्याचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जलतरण तलावात पोहायला गेलेल्या संगणक अभियंत्याला चक्कर आल्याने तो पाण्यात पडला. पाण्यात श्वास गुदमरल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पिंपरी-चिंचवड येथील थेरगाव येथे घडली. वैभव आचल जैन (वय-२३) असे मृत्यू झालेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. वैभव हा हिंजवडी येथील एका नामांकीत कंपनीत कामाला होता. घटनेच्यावेळी जलतरण तलावाजवळ जीवरक्षक असते. तर वैभवचा जीव वाचला असता अशी हळहळ स्थानिकांनी व्यक्त केली.

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव हा शनिवारी सायंकाळी थेरगाव येथील महापालिकेच्या जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला होता. जलतरण तलावाच्या काठावर उभा असताना त्याला अचानक वैभवला चक्कर आली. त्यामुळे तो पाच फूट खोल जलतरण तलावातील पाण्यात पडला. डोक्याला इजा झाल्याने आणि तो पाण्यात पडताना त्याला कोणी पाहिले नाही. दहा मिनीटांनी जीवरक्षकांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले.

बेशुद्ध अवस्थेत त्याला तातडीने औंध येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती जीवरक्षक सतीश कदम यांनी दिली. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त-

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like