काय सांगता ! होय, पुण्यात होम डिलेव्हरी चार्जेस विना ‘घरपोच’ भाजीपाला, ‘ताजा’ अन् एकदम ‘र्निजंतूक’, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनामुळं आतापर्यंत हजारो लोकांचे प्राण गेले आहेत. भारतात देखील कोरोनाचा फैलाव होत आहे. दरम्यान, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं मोठी पावलं उचचली आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा सोडून बाकी सर्व काही बंद आहे, भाजपाला विक्रीचे दुकाने, किराणा सामानाची दुकाने तसेच औषध विक्रीचे दुकाने चालू असली तरी सर्वसामान्य नागरिक सध्याच्या परिस्थितीत घराबाहेर पडण्याची रिस्क घेत नाही. त्यामुळे पुण्यातील सुप्रसिध्द कंपनीनं सर्व पुणेकरांसाठी घरपोच भाजीपाला पुरविण्यासाठी सुविधा चालू केली आहे.

घरपोच पुरविण्यात येणारा भाजीपाला हा ताजा अन् एकदम र्निजंतूक असणार आहे. होम डिलेव्हरीसाठी कुठलाही चार्ज आकारण्यात येणार नाही. सध्या ही कंपनी थेट शेतकर्‍यांकडून भाजीपाल्याची खरेदी करते आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहचवते. ज्यांना ऑर्डर द्यावयाची असेल त्यांनी फक्त www.24by7.store या वेबसाईटवर जाऊन ऑर्डर करायची. पुण्यातील अंतरानुसार ती ऑर्डर किमान दिड तास ते  जास्तीत जास्त 24 तासाच्या आत पुर्ण केली जाते. फक्त ऑर्डर किमान 500 रूपयांची करणं गरजेचं असल्याचे कंपनीचे सर्वेसर्वा पंकज घोडे यांनी पोलीसनामा ऑनलाइनशी बोलताना सांगितलं.