गृह मंत्री अनिल देशमुखांनी पुणे पोलिसांना दिला नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा सल्ला अन् केले कौतुक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन अधिकार्‍यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. तसेच, पुणे पोलिसांना नागरिकांचे प्रश्न सोडवा, असा सल्लाही दिला.
राज्याच्या गृहमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रथमच पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाची पहाणी केली. तसेच, पुणे पोलीसांनी सुरू केलेल्या भरोसा सेल, सेवा कार्याप्रणाली, महिलांच्या सुरक्षासाठी स्थापन केलेल्या दामिणी पथकाला भेट दिली.

यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, संजय शिंदे यांच्यासोबतच पाचही परिमंडळचे पोलीस उपआयुक्त आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुणे पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी बैठक घेतली. त्यांनी शहराचा आणि गुन्हेगारीबाबत माहिती घेतली. तसेच, पोलिसांना भेडसावणार्‍या अडचणींची बाबतही विचारपूस केली. त्यावेळी त्यांना काही अडचणी सांगण्यात आल्या आहेत. त्या लवकरच सोडविण्यात येतील असे आश्वासन देखील यावेळी दिले आहे. तसेच, पुणे पोलिसांच्या कामाचे कौतुक देखील केले. तर, सामान्य नागरिक अडचण तसेच तक्रार घेऊन येतात. त्यांचे प्रश्न तत्काळ सोडवा. त्यांना न्याय देण्याचा सल्ला यावेळी देशमुख यांनी दिला.

आंध्रप्रदेशच्या धर्तीवर दिशा योजनेतंर्गत कायदा
राज्यात हिंगणघाट घटनेनंतर अशा घटना पुन्हा होउ नये यासाठी आंध्रप्रदेशाच्या धर्तीवर दिशा योजनेतंर्गत कायदा करण्यासंदर्भात प्रयत्न केला जाणार आहे. माहिती घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाछयांसह गृहमंत्री अनिल देशमुख 20 पेैबु्रवारीला आंधप्रदेशात जाणार आहे.