Pune : शहरात निघालेली गुंडाच्या अंत्ययात्रेची रॅली चुकीचीच, पुढे असे होऊ नये; संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात निघालेली गुंडाच्या अंत्ययात्रेची रॅली चुकीचीच आहे. पुढे असे होऊ नये. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. सध्या कोरोनाचा काळ असून, नियम सर्वांनी पाळले पाहिजेत असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील Dilip Walse Patil यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील Dilip Walse Patil यांनी आज पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, जालिंदर सुपेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. बैठकित त्यांनी शहरातील गुन्हे व गुन्हेगारीचा आढावा घेतला आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी सवांद साधला. त्यावेळी ते बोलत होते. गृहमंत्री वळसे पाटील Dilip Walse Patil म्हणाले, शहरात गुंडाच्या अंत्ययात्रेची निघणे हे चुकीचेच आहे. नियम पाळणे गरजेचे असून, वरिष्ठांकडून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे.

दरम्यान, पोलीस आयुक्त यांनी अंतर्गत बदल्या संदर्भात काढलेले या अँपचे त्यांनी कौतुक करत हे अप चांगले आहे. यामुळे बदली प्रक्रियेत पारदर्शकता येईल. तर वशिलेबाजी होणार नाही. हे एक चांगले पाऊल आहे. भविष्यात राज्यातील आयुक्तालये व जिल्हा पोलिस विभागात ही प्रणाली सुरू करण्याबाबत विचार करता येईल, असे त्यांनी यावे सांगितले.

जालन्यात एका भाजप कार्यकर्त्याला पोलिसांनी मारहाण केल्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, हा व्हिडीओ पाहिला आहे. कारवाई करत असताना जास्तच मारहाण केली गेली. तो कार्यकर्ता देखील रुग्णालयाच्या ओपीडीपर्यंत गेला होता व त्याने दंगा केला होता. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. मराठा आरक्षण आणि त्याबाबत भाजपचे नेते आमदार चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केल्याबाबत त्यांनी कोरोनाच्या काळात असे चिथावणीखोर वक्तव्य करू नये. सामंजस्य भूमिका घ्यावी लागेल असे म्हंटले आहे.

Also Read This : 

Pune : पुण्यात रुग्णवाहिकांसाठीचे नवे दर निश्चित

 

तोंड आल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय ; जाणून घ्या

 

भाजपच्या महिला खासदारावर हल्ला; जिल्हाधिकाऱ्यांनीही उचलला नाही फोन Video

 

अशक्तपणा दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय