सातारा-पुणे महामार्गावर कात्रजवळ भीषण अपघात, 6 वाहनांचे मोठे नुकसान तर दोघे जखमी

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुणे बेंगलोर महामार्गावर स्वामी नारायण मंदिराच्या परिसरात मध्यरात्री वेगवेगळे दोन भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यात दोन जण जखमी झाले असून, 6 वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पहिल्या अपघातात ट्रक चालक ज्ञानसैगर नटरायन (वय 39, रा. तामिळनाडू) व कार चालक गोकर्णलाल मलीक राम (वय 29, रा. वडगाव शेरी, मूळ. दिल्ली) हे जखमी झाला आहे. त्याचा पाय फॅक्चर झाला आहे. याप्रकरणी ट्रक चालक धनुष सेलवंम (वय 35, रा. तामिळनाडू) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास एका कार चालक पुण्याकडून बेंगलोर मार्गाने जात होता. यावेळी स्वामी नारायण मंदिराजवळ अचानक समोर कार आल्याने त्याने ब्रेक दाबले. त्यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रक त्याला जाऊन धडकला. त्यानंतर एक कंटेनर आणि ट्रक एकमेकावर आदळला गेला. चार वाहने एकमेकावर आढळले. यात महिंद्रा आणि ट्रक चालक गंभीर जखमी झाले आहेत.

तर दुसरा अपघात मंदिराच्या पुढे 200 मीटर अंतरावर झाला आहे. यामध्ये एका ट्रकने दुसऱ्या ट्रकला उडवले आहे. यात बसवराज बस्वअप्पा चंद्रगी (वय 24, रा. बेळगाव) हा जखमी झाला आहे. चंद्रगी हा भरधाव वेगात जात असताना त्याने पाठीमागून दुसऱ्या ट्रकला उडवले. यात तो जखमी झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक देविदास घेवारे, उपनिरीक्षक खेडकर व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवनांना बोलावून ट्रकमध्ये अडकलेल्या एका चालकाला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अपघात ग्रस्त वाहने वाजुला काढण्यात आली. पहाटे वर्दळ कमी असते. त्यामुळे वाहतूक काही वेळातच वाहतूक पूर्ववद झाली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

You might also like