बिल न भरल्याने पुण्यातील हॉस्पिटलने 3 दिवसापर्यंत दिला नाही कोरोना पीडित रूग्णाचा मृतदेह, आठ सदस्यांची टीम करणार चौकशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्हा आरोग्य विभागाने कथित प्रकारे बिल न भरल्याने एका कोरोना व्हायरस संक्रमित रूग्णाचा मृतदेह न देण्याच्या प्रकरणात तळेगाव दाभाडेच्या एका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या विरूद्ध सोमवारी चौकशीचे आदेश दिले. जिल्हा प्रशासनाने हॉस्पिटलच्या विरूद्ध तक्रारीवर चौकशीसाठी आठ सदस्यीय समिती बनवली आहे, ज्यामध्ये जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी, बी. जे. मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटलचे एक डॉक्टर, अन्न आणि औषध प्रशासनाचा एक अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा सिव्हिल सर्जन यांचा समावेश आहे.

जिल्हा सिव्हिल सर्जन अशोक नंदापुरकर यांनी म्हटले, मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून तक्रार मिळाली आहे की, हॉस्पिटल व्यवस्थापनाने बिलाची रक्कम न मिळाल्याने कथित प्रकारे एका कोविड-19 पीडिताचा मृतदेह तीन दिवसांपर्यंत रोखून ठेवला होता.

त्यांनी म्हटले, आठ सदस्यीय समिती तक्रारीची चौकशी करण्यासाठी मंगळवारी हॉस्पिटलचा दौरा करेल. बारणे यांनी म्हटले की, मावळच्या एका गरीब रूग्णाचा काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसच्या संसर्गाने मृत्यू झाला होता आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून वैद्यकीय बिल भरल्यानंतर सुद्धा हॉस्पिटल व्यवस्थापन मृताच्या कुटुंबियांकडून आणखी पैसे मागत होते.