शहरात घरफोडीचे सत्र सुरूच, बिअर शॉपीसह 9 ठिकाणी घरफोडया

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात घरफोड्याचे सत्र कायम असून, उत्तमनगर भागात बिअर शॉपी सोबतच विविध भागात 9 फ्लॅट फोडण्यात आले आहेत. यात लाखोंचा ऐवज चोरीस गेला आहे.

याप्रकरणी भगवान मोरे (59) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांची कोंढवे-धावडे येथे पिकॉक बिअर शॉपी आहे. नेहमी प्रमाणे ते शनिवारी सकाळी बिअर शॉपी उघडण्यास गेले असता. त्यावेळी त्यांना दुकानाचे शटर उचकटले असल्याचे दिसून आले. त्यांनी पाहिले असता गल्ल्यातील 7 हजाराची रोकड आणि 4 बिअरचे बॉक्स चोरीला गेले असल्याचे दिसून आले. माहिती मिळताच उत्तमनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसे पहाणीकरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उत्तमनगर पोलीस करत आहेत.

तसेच, हडपसर आणि मुंढवा भागात सोसायटीमधील एकूण आठ फ्लॅट फोडण्यात आले आहेत. मात्र भाडेकरू गावी असल्याने चोरीस काय गेले हे समजलेले नाही. मुंढवा येथील कॅम्प्रीव्हिला सोसायटीत 4 फ्लॅट चोरट्यांनी फोडले आहेत. याबाबत कुणाल कमलनाथ (वय 26) यांनी फिर्याद दिली आहे. मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कुणाल यांच्यासह त्याच्या सोसायटीतील 201, 301 व 101 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये घरफोडी झाल्याचे दिसून आले आहे. या फ्लॅटमध्ये भाडेकरू राहत असून ते गावी आहेत. त्यामुळे नेमके काय चोरीस गेले याची माहिती मिळालेली नाही. तर हडपसर येथे प्रियदर्शन सोसायटीत देखील 4 फ्लॅट फोडल्याचे समोर आले आहे. योगेश जगन्नाथ नागवडे (वय 35) यांच्या फ्लॅटमधून 19 हजार रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले आहेत. तसेच, या सोसायटातील तीन व्यक्तींच्या फ्लॅटमध्ये घरफोडी केल्याचे दिसून आले आहे. पण तेही गावी गेले असल्याने फ्लॅटमधून काय चोरीला गेले हे समजू शकलेले नाही. अधिक तपास हडपसर पोलिस करत आहेत.