Pune : कोथरूड भागात 5 फ्लॅट फोडले

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – घरफोड्या करणाऱ्या टोळ्या आता जास्तच सक्रिय झाल्या असून, ते आता एक घर न फोडत एकाच इमारती चार-चार; पाच-पाच फ्लॅट फोडू लागले आहेत. कोथरुड भागात चोरट्यांनी एकाच इमारतीत 5 फ्लॅट फोडले आहेत.

याप्रकरणी संतोष देशपांडे (वय 50) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशपांडे हे व्यवसायिक आहेत. येथील उजवी भुसारी कॉलनीत श्वेता रेसिडेन्सी इमारतीत राहण्यास आहेत. याच इमारतीत त्यांचे ऑफिस आहे.
दरम्यान त्यांनी ऑफिस कुलूप लावून बंद केले होते. यादरम्यान चोरट्यांनी त्यांचे ऑफिसचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच आत चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्यांच्या शेजारी असणारे आणखी 4 फ्लॅट फोडण्यात आले आहेत. यातील एक फ्लॅट कोल्हापूर येथील व्यक्तीचा आहे. ते गावी असून, त्यांच्या घरातून काही किमती ऐवज चोरीला गेला आहे. पण ते सध्या नसल्याने किती माल गेला हे समजू शकलेले नाही. मात्र इतर चार फ्लॅटमधून चोरट्यांच्या हाती काही लागलेले नाही. अधिक तपास कोथरूड पोलीस करत आहेत.