Pune : बिबवेवाडी, हडपसर, कोथरूड परिसरात चोरटयांचा धुमाकूळ, 3 दुकाने अन् एक फ्लॅट फोडला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी पुणेकरांसोबतच पोलिसांच्या देखील “नाकी नवं” आणला असून काही केल्या घरफोड्याच्या या घटना रोखण्यात यश येत नसल्याचे दिसत आहे. आज पुन्हा तीन दुकाने व एक फ्लॅट फोडला आहे.

बिबवेवाडी पोलीस ठाण्यात पारसमल वाघाराम राठोड (वय 34, रा.सुखसागरनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राठोड यांचे गंगाधाम रस्त्यावरील कृष्णा हार्डवेअर अँड सेल्स नावाचे दुकान आहे. चोरट्यांनी दुकान बंद असताना ते फोडून 35 हजार रोख व 4 हजार रुपयांची वायर घरफोडी करून नेल्याचे समोर आले आहे. त्यासोबतच पौड रस्त्यावरील साई सयाजी बिल्डींमधील बाटा शोरूमध्ये घरफोडीचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात लहू रोहिदास राठोड (वय 34, रा. धायरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार कोथरूड पोलिस अधिक तपास करत आहेत. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. पण, चोरट्यांना आतमध्ये काहीही हाती लागले नाही. याप्रकरणी

तसेच, हडपसर येथील ए एम मेन्स वेअर नावाच्या दुकानात घरफोडी झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भीम दिलीप गारोळे (वय 30, रा. ससाणेनगर, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी 42 हजार रुपयांचा ऐवज घरफडी करून नेला आहे. हडपसर पोलिस अधिक तपास करत आहेत.

कोंढव्यातील शिवनेर नगरमध्ये घराचे छप्पर उचकटून सव्वा दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनिलकुमार पांडे (वय 48) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घर बंद असताना छप्पर उचकटून आत प्रवेश केला. या ठिकाणाहून 2 लाख 22 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस अधिक तपास करत आहेत.