Pune : कसबा पेठेत बंद फ्लॅट फोडून चोरटयाने केला 3 लाखाचा ऐवज लंपास

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यात कुलूप बंद घर फोडीचे सत्र कायम असून, चोरट्यांनी पुन्हा कसबा पेठेत बंद फ्लॅट फोडून 3 लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. काल कोंढवा भागात एकाच इमारतीत 5 फ्लॅट फोडले होते.

याप्रकरणी 57 वर्षीय महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कसबा पेठेतील जुन्या सायकल दवाखान्याजवळ राहतात. दरम्यान त्या 5 दिवसांसाठी घराला कुलुप लावून गेल्या होत्या. यावेळी चोरट्यानी घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच रोकड व दागिने असा 2 लाख 93 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. काल त्या परत आल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास उपनिरीक्षक एन. बी. पाटील हे करत आहेत.