पुण्यातील कात्रज परिसरात 3 लाखाची घरफोडी

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरातील घरफोड्याचे सत्र सुरूच असून, कात्रज भागात बंद फ्लॅट फोडून 3 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. 23 मार्च ते 19 मे या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी ज्योतीराम दुरुडे (वय 38, रा. कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कात्रज येथील नेन्सी लेक होम सोसायटीत राहतात. दरम्यान कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन केले होते. त्यामुळे ते घराला कुलूप लावून गावी गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केले.

तसेच घरातील 55 हजाराची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण 3 लाख 4 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ते गावावरून परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.