पुण्यातील नवी पेठेत पावणे चार लाखाची घरफोडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, नवी पेठेत चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून पावणे चार लाखांचे दागिने चोरुन नेले आहेत. पोलिसांनी स्ट्रीट क्राईम काही केल्या रोखता येत नसल्याचे वास्तव यावरून दिसत आहे.

याप्रकरणी दीपक कुलकर्णी (वय 70, रा. नवी पेठ) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक हे शासकीय नोकरीतून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या पत्नीसह सिद्धीविनायक मंगल सोसायटीत राहायला आहेत. चार दिवसांपुर्वी ते पत्नीसह देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून 3 लाख 86 हजारांचे दागिने चोरुन नेले. देवदर्शनावरुन घरी परत आल्यानंतर चोेरी झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व्ही. एम . देशमुख अधिक तपास करीत आहेत.