येरवडा परिसरात भरदिवसा 2 लाखाची घरफोडी

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – येरवडा परिसरात भरदिवसा बंद फ्लॅट फोडून त्यातील दोन लाखांचा ऐवजावर डल्ला मारला आहे. वडगावशेरी परिसरात मंगळवारी हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी रूपेश खरात (वय 44, रा. ) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तत्पुर्वी खरात हे वडगावशेरी येथील त्र्यंबकेश्वर सोसायटीत राहण्यास आहेत. दरम्यान, मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ते कामानिमित्त कुटूंबियासोबत घराला कुलूप लावून गेले होते. त्यादरम्यान, चोरट्यांनी घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच, त्यांच्या बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण 2 लाख 4 हजार रुपायंचा ऐवज चोरून नेला. दुपारी साडे चार वाण्याच्या सुमारास ते परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी येरवडा पोलीसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.

You might also like