Pune : विमानतळ परिसरातील बंगला चोरटयांनी फोडला, सव्वा 2 लाखाचा ऐवज लंपास

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरातल्या घरफोड्या काही केल्या थांबत नसून, विमानतळ भागात बंद बंगला फोडून चोरट्यांनी सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी कल्पना हेडावु (वय 55) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या लोहगाव येथील खेसे पार्क येथे त्यांचा बंगला आहे. यादरम्यान त्या कामानिमित्त 16 ते 18 ऑक्टोबर अश्या दोन दिवस कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. यावेळी चोरट्यांनी त्यांचे बंगल्याचे मुख्यदार उघडून आत प्रवेश केला. तर त्यांच्या बेडरूममध्ये घुसून कपाटात ठेवलेली रोकड व दागिने असा 2 लाख 12 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. काल त्या परत घरी आल्यानंतर त्यांना चोरी झाली असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहेत.