भारती विद्यापीठ परिसरात बंद फ्लॅट फोडला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात बंद फ्लॅट फोडून लाखो रुपयांवर डल्ला मारण्याचे सत्र सुरूच असून, भारती विद्यापीठ परिसरात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून सव्वा लाखांचा ऐवज चोरून नेला आहे.

याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कुटूंबासह स्वामी सदनमध्ये राहायला आहेत. चार दिवसांपुर्वी कामानिमित्त त्यांना बाहेरगावी जायचे होते. त्यामुळे त्या घराला कुलूप लावून गेल्या. यादरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच, घरातील 1 लाख 30 हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक एम. डी. पाटील हे करीत आहेत.