बंद फ्लॅट फोडला, दीड लाखांचा ऐवज लंपास

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – लॉकडाऊन काळात सुरू झालेले घरफोड्याचे सत्र कायम असून, बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी दीड लाखांचा ऐवज चोरला. वानवडी भागात ही घटना घडली. याप्रकरणी अक्षय अल्हाट (वय ३०, रा. हडपसर) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय एका खासगी कंपनीत कामाला आहे. तो जैन टाउनशिपमधील ए विंगमध्ये राहायला आहेत. लॉकडाउनमुळे १८ एप्रिलला मूळगावी गेले होते. त्यानंतर त्याच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार हजारांची रोकड आणि दागिने मिळून १ लाख ४४ हजारांचा ऐवज चोरुन नेला. अधिक तपास उपनिरीक्षक अभिजीत जोगदंड करीत आहेत.

You might also like