पुण्यातील चतुःश्रृंगी परिसरात घरफोडी, एक लाखाचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात घरफोड्याचे सत्र कायम असून, चतुःश्रुगीत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व पाणी तापविण्याचा तांब्याचा बंब असा 1 लाखांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ज्ञानदेव इष्टे (वय ३३ ) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानदेव हे पुणे विद्यापीठ येथील शासकीय तंत्रनिकेतन कर्मचारी वसाहतील राहायला आहेत. कामासाठी ते कुटूंबासहित मूळगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि पाणी तापविण्याचा तांब्याचा बंब असा एक लाखांचा ऐवज चोरुन नेला.

गावावरून परत आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर ज्ञानदेव यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. अधिक तपास सहायक निरीक्षक मोहन जाधव अधिक तपास करीत आहेत.