पुण्यातील बिबवेवाडीत घरफोडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील घरफोड्याचे सत्र थांबत नसून, बिबवेवाडी भागात भरदिवसा फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी १८ हजारांचा ऐवज चोरुन नेला. गुरुवारी दुपारी तीन ते साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी राम डांगी (वय ५०, रा. दत्तदिगंबर सोसायटी, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम एका कंपनीत नोकरीस आहेत. ते कुटूंबियासह दत्तदिगंबर सोसायटीत राहायला आहेत. गुरुवारी दुपारी ते घरात नसताना चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडले.

त्यानंतर रोख रकमेसह १८ हजारांचा ऐवज चोरुन नेला. राम बाहेरुन आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र उसगावकर करीत आहेत.