पुणे शहरात घरफोड्याचा धुमाकूळ सुरूच; तीन दुकाने फोडली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  शहरात सुरू असणाऱ्या घरफोड्याचा धुमाकूळ सुरूच असून, येरवड्यात तीन दुकाने चोरट्यांनी फोडले आहेत. काही केल्या पोलिसांना या घरफोड्या रोखणे शक्य होत नसल्याचे दिसत आहे. पण पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

याप्रकरणी माधव वारकडे (वय ३८, रा. वडगाव शेरी) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माधव हे शास्त्रीनगरमधील मेडीप्लस मेडीकलचे मॅनेजर आहेत. मंगळवारी रात्री घरी जात असताना त्यांनी मेडीकल बंद केले. त्यावेळी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी शटर उचकटून गल्ल्यातील २७ हजारांची रोकड चोरुन नेली. त्यानंतर चोरट्यांनी नागपूर चाळीतील लक्ष्मण पमनानी यांच्या दुकानाचे शटर उचकटून 3 हजारांची रोकड चोरुन नेली. त्याशिवाय संपतसिंग राजपूत यांची मोबाईल शॉपीचे शटर उचकण्याचा प्रयत्न केला आहे. सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर त्यानी पोलीसाकडेे धाव घेतली. अधिक तपास सहायक निरीक्षक बलभीम ननवरे करीत आहेत.