पुण्याच्या खडकी परिसरात 21 लाखांची घरफोडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एका रात्रीसाठी घराला कुलूप लावून भावाच्या घरी गेल्यानंतर चोरट्यांनी घरफोडीकरत तबल 21 लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शहरात घरफोड्याचे सत्र थांबत नसून, याला आवर घालणे पोलिसांपुढे एक आव्हान उभे राहिले आहे.

याप्रकरणी प्रशांत आमिनभावी (वय ५०, रा. वाकडेवाडी ) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत एका शासकीय ऑफिसमध्ये खासगी कामेे करतात. वाकडेवाडी येथील भाले इस्टेटमध्ये राहिला आहेत. मागील महिन्यांत गौरी गणपती सणाला त्यांनी इतर नातेवाईकांचे दागिने घरात आणून ठेवले होते. त्यांचा भाऊ सहकारनगर परिसरात राहायला आहे. तिथे वाढदिवसाच्या निमित्ताने ते 14 सप्टेंबरच्या रात्री कुटुंबासह घराला कुलूप लावून गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला.

कपाटातील ३ लाखांची रोकड व दागिने असा मिळून २१ लाख २० हजारांचा ऐवज चोरुन नेला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 सप्टेंबर रोजी दुपारी ते घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. दरम्यान सोसायटीत सीसीटीव्ही नाहीत. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शफिल पठाण यांनी दिली.