शहरात घरफोड्यांचे सत्र कायम, 5 लाखांचा ऐवज चोरीला

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील घरफोड्यांचे सत्र कायम असून, चोरट्यांनी चतुश्रृंगी व कोंढव्यात बंद फ्लॅट फोडून 5 लाखांवर डल्ला मारल्याच्या दोन घटना घडल्या आहेत.

याप्रकरणी अण्णाभाऊ गायकवाड (वय 50) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी गायकवाड हे औंध परिसरातील कस्तुरबा वसाहत राहतात. कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच, घरातील बेडरूममधून 2 लाख 28 हजारांचे दागिने चोरुन नेले. गावावरून परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

तसेच, दुसरी घटना उंड्रीत घडली आहे. याप्रकरणी सुरेश गुप्ते यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुप्ते हे उंड्री परिसरात राहण्यास आहेत. दरम्यान, ते कुटूंबियासोबत कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गावी होते. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेशकरून चोरट्यांनी 2 लाख 67 हजारांचा ऐवज चोरुन नेला.