पुण्यातील कात्रज परिसरात घरफोडी, पावणे आठ लाखाचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहरातील घरफोड्याचे सत्र कायम असून, कात्रज भागात एका व्यवसायिकाचे बंद घरफोडून पावणे आठ लाखांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. यामुळे पुणेकरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याप्रकरणी मोहित घुमे (वय 34) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा कन्स्ट्रक्शन व हॉटेल व्यावसाय आहे. दरम्यान ते कात्रज-कोंढवा रस्त्यावरील लक्ष्मण निवास सोसायटीत राहतात. कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. त्यादरम्यान चोरटे दुसऱ्या मजल्यावरून गॅलरीच्या सहाय्याने आत शिरले. तर दरवाजातून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील रोकड आणि सोन्याची व चांदीचे दागिने असा 7 लाख 63 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. फिर्यादी हे घरी परत आल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार समजला. त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्हीची पडताळणी करण्यात येत असून त्याद्वारे चोरट्यांचा माग काढला जात आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील हे करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like