चतुश्रृंगी परिसरात बंद फ्लॅट फोडला

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, चतुश्रृंगी परिसरात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून 1 लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला आहे.

याप्रकरणी 23 वर्षीय महिलेने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कुटूंबासह भावाच्या वाढदिवसानिमित्त माहेरी गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून 1 लाख 15 हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विशाल पवार अधिक तपास करीत आहेत.