Pune : ‘पती-पत्नी और वो’ ! बालगंधर्व चौकात डेक्कन पोलिसांनी अडवली कार; प्रकरण गेलं घटस्फोटापर्यंत, पत्नी म्हणाली – ‘आता नातेवाईकांनाच बोलावते अन्…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पोलिसांच्या चौकशीत कधी-काय समोर येईल काही हे सांगण कठीणच आहे. आता पहा ना एक कार पोलिसांनी नाकाबंदीत पकडली आणि प्रकरण थेट घटस्फोटापर्यंत गेल आहे. सध्या या प्रकरणाची पोलीस दलात आणि तिथं उपस्थित असणार्‍यांमध्ये खमंग चर्चा सुरू आहे. घडलेल्या प्रकाराची कहाणी चित्रपटामधील वाटणारी आहे पण ते प्रत्यक्षात घडलं आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा ! 10 वी चा निकाल जून अखेरपर्यंत जाहीर होणार

त्याच झालं असं, सध्या कोरोना संसर्गामुळे शहरभर पोलीस नाकाबंदी करत विनाकारण फिरत असणाऱ्या व्यक्तींना पकडत आहेत. कारण योग्य नसेल तर कारवाई केली जाते आणि दंड आकरला जातो. गुरुवारी देखील डेक्कन पोलीस बालगंधर्व चौकात नाकाबंदी करत होते.

तात्काळ शुगर कमी करण्यासाठी रोज ‘या’वेळी करा ब्रेकफास्ट !

साधारण दुपारी चारची वेळ असेल. त्यावेळी एक कार आली. पोलिसांनी ती अडवली. त्यात एक महिला आणि एक पुरूष असे दोघे होते. पोलिसांना वाटलं हे दाम्पत्य असेल. त्यांनी कुठं जातंय परवानगी आहे का, असे नेहमीचे प्रश्न विचारले. त्यावेळी त्या व्यक्तीने पत्नीला आणण्यास जात आहे, असे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. या कोण आहे, अशी विचारणा करताच त्याने सांगितले ही पत्नीची मैत्रीण आहे. मग मात्र पोलीस आणखीनच चौकशी करू लागले. एकतर कारण योग्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी दंड भरावा लागेल असे सांगितले.

Today Gold Price : सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण ! रेकॉर्डब्रेक 8 हजारांनी सोनं स्वस्त, जाणून घ्या आजचा दर

इतकं सांगूनही त्या व्यक्तीने पोलिसांना खोट सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. तर दंड भरायला पैसेही नाहीत असे म्हणू लागला. मग, पोलिसांनी त्याला खरोखरच पत्नीला आणायला जायचे असेल म्हणून ठीक आहे म्हणत पत्नीला बोलवा असे सांगितले. तर त्याने पत्नीला तिथे बोलवून घेतले. मग काय त्याची पत्नी तेथे आली आणि घडलं भलतंच. हे पाहून पोलीसही चक्राहून गेले आणि त्यांनी डोक्यालाच हात लावला. तर इतर उपस्थितांना हासू काही आवरेना. कारण, पत्नी आली तिने पतीचा एक हजार रुपये दंडही भरला पण, तिथंच त्या महिलेला पाहून थयथयाट घातला तर पतीनं डोक्याला हात लावून पत्नीचा त्रागा पाहून पसंत केलं. सुमारे पाऊण तास कारमधून आलेली महिला व तो थांबून होते.

पुस्तक वाचल्याने केवळ आपले ज्ञान वाढणार नाही तर आरोग्यासही होतील आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या

जाता-जाता मात्र त्याच्या पत्नीने त्या महिलेचं आणि पतीच प्रकरण महिला पोलिसांसमोर उघड केलं. ती म्हणाली माझ्या परस्पर हे या मुलीला घेऊन आले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून हे प्रकरण सुरू आहे. आता मी नातेवाईकांना बोलावते आणि घटस्फोट घेते, असे म्हणतच ती महिला दुचाकीवरून निघून गेली. आता प्रश्न पडला आहे तो नेमकं पुढं काय झालं असेल याचा.

चंद्रपूरातील दारुबंदी ‘उठविली’ अन् नागपूर, यवतमाळ, मध्यप्रदेशातील मद्यमाफियांचा ‘बाजार’ उठला !

रोज अनेकजण विनाकारण फिरताना दिसतात. काहीही कारण काढून नागरिक बाहेर पडत आहेत. दंड करा किंवा कारवाई करा, नागरिक बाहेर पडण काही थांबवत नाहीत. आम्ही पोलीस या काळात काम करत आहोत. नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा देखील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी दररोज ‘हे’ आसन करा !