पुण्यात धक्कादायक प्रकार ! पाहुण्यांनीच अल्पवयीन युवतीला लावलं ‘वाम’मार्गाला, पती-पत्नीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नातेवाईकांनीच अल्पवयीन मुलीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पुण्यात आणल्यानंतर तिला वाम मार्गाला लावल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहे. बुलढाणा येथून या मुलीला पुण्यात आणले होते. त्या नातेवाईक दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे. दिलीप सखाराम पवार (वय 43) व अरुणा दिलीप पवार (दोघेही रा.राहणार पोखरी, ता. जि. बुलढाणा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दोघाविरोधात बुलढाना ग्रामिण पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी ही संबंधित दाम्पत्यांची नातेवाईक आहे. दाम्पत्य नोकरीनिमित्त गेल्या अनेकवर्षापासून पुणे जिल्ह्यात राहतात. दोघांनी तिला चांगली नोकरीस लावून पैसे कमवू, असे सांगत मुलीच्या पालकांना विश्वासात घेतले. त्यानंतर त्या मुलीला बुलढाण्यातून पुण्यात आणले. त्यानंतर त्या मुलीला वाम मार्गाला लावले. दरम्यान आरोपी महिला ही शहरातील एका नामांकित मॉलमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करत होती. तर तिचा पती बांधकाम व्यावसायावर काम करतो. दरम्यान याप्रकरणी बुलढाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्याबाबत हडपसर पोलिसांना याची माहिती देण्यात आली होती. त्यावेळी हडपसर पोलीस तीन दिवसरात्र ग्रामिण परिसर पालथा घालून दाम्पत्याचा शोध घेण्यात येत होता. यावेळी दिलीप पवार हा मांजरी बुद्रुक परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार त्याला सापळा रचून पकडण्यात आले आहे. परिमंडळ पाचचे उपायुक्त सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे, कर्मचारी नितीन मुंढे, प्रातप गायकवाड, शिवळे, नाळे, शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.