पत्नी सांडून देत होती दारूची बाटली, पतीनं केले हातावर सपासप वार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – घरी दारू आणल्यानंतर पत्नी ती दारू ओतून देत असल्याच्या रागाने पतीने पत्नीच्या हातावर भाजी कापण्याच्या चाकूने वार केल्याची घटना पुण्यात घडली. लिलावती अरुण केंगले (वय ३०, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती अरुण सीताराम केंगले (वय ३४) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिलावती व अरुण हे पुण्यातील धानोरी भागात राहण्यास आहेत. त्यांचा काही वर्षापूर्वी विवाह झाला आहे. अरुण मंगळवारी सायंकाळी दारु पिऊन सोबत आणखी एक दारूची बाटली घेऊन आला. ती बाटली त्याने घरात ठेवली होती. ती बाटली पत्नीने पाहिले. ती घेऊन ओतून देण्यासाठी स्वायपाक घरात घेऊन गेली.

ती दारू ओतून देऊ लागली. त्यावेळी यावरून दोघात वाद झाला. या वादातून चिडलेल्या अरूणने तिला ओढत बाहेर घेऊन आला. रागाच्या भरात त्याने पत्नीच्या हातावर चाकूने वार केले. यामध्ये पत्नी जखमी झाली. त्यानंतर तिने उपचार घेऊन पतीच्या विरोधात तक्रार दिली. अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.